विदर्भ व नागपुरातील शनिवारच्या महत्त्वाच्या घडामोडी | आजच्या ठळक बातम्या | Sakal Media |

2021-04-28 805

नागपूर :  साठेबाजी आणि सणासुदीच्या निमित्ताने वाढलेल्या मागणीमुळे खाद्यतेलाचे भाव चांगलेच कडाडले आहे. त्यामुळे गृहिणींच स्वयंपाक घरातील बजेटही कोलमडल असून खाद्यतेलाच्या भावात गेल्या महिन्याभरात किलोमागे १० रुपयांची वाढ झालेली आहे. सामान्य जनतेला कोरोनाशी लढत असताना आता जीवनावश्‍यक वस्तूंच्या भाववाढीचा सामना करावा लागत आहे. शहरात दररोज ३५ लाख लीटर तेलाची विक्री केली जात असून त्यात सोयाबीन तेलाची विक्री सर्वाधिक आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा साधेपणान गणोशेत्सव साजरा केला जाणार आहे. शहरातीत ९०४ सार्वजनिक मंडळांनी गणेशोत्सवासाठी परवानगी घेतली असली, तरी प्रत्यक्षात त्यापेक्षा अधिक ठिकाणी गणेशोत्सव साजरा होणार आहे. अप्रिय घटनांना आळा घालून गणेशोत्सव निर्विघ्न पार पडावा यासाठी शहर पोलिस दल सज्ज झाल आहे. शहरात बाराशेहून अधिक पोलिस अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. त्यांच्या सोबतीला राज्य राखीव दल, शिघ्रकृती दल, दंगा नियंत्रण पथकही तैनात करण्यात आले आहेत.

२२ ऑगस्ट ते १ सप्टेंबरदरम्यान घरोघरी गणेशोत्सव साजरा होणार आहे. पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, सहपोलिस आयुक्त डॉ. नीलेश भरणे, अप्पर पोलिस आयुक्त शशिकांत महावरकर यांच्या देखरेखीत परिमंडळ निहाय बंदोबस्त लावण्यात आला आहे. ५ पोलिस उपायुक्त, १० सहायक पोलिस आयुक्त, ३७ पोलिस निरीक्षक, २५ सहायक पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक, ४१४ पुरुष कर्मचारी व ११८ महिला कर्मचारी, ५६७ पुरुष व महिला होमगार्ड नियुक्त करण्यात आले आहे.  राज्य राखीव पोलिस दलाच्या १४ कंपन्या, ४ दंगा नियंत्रण पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियंत्रण कक्ष येथे ३ दंगा नियंत्रण पथक, राज्य राखीव पोलिस दलाच्या ४ कंपन्या आणि शिघ्रकृती दलाचे पथक राखीव ठेवण्यात आले आहे. सोबतच विशेष शाखेचे कर्मचारी साध्या वेषात तैनात राहतील. वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठीही संपूर्ण शहरात वाहतूक पोलिस तैनात असतील. संबंधित पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी नियमीत गस्त घालून सार्वजनिक मंडळांना भेटी देतील. चितारओळ, कॉटन मार्केट, गणेश टेकडी आदी गणेश मुर्ती विक्रीच्या ठिकाण विशेष बंदोबस्त राहील. संवेदनशील ठिकाणी फिक्स पॉईंट राहणार असून गर्दीच्या ठ?

Videos similaires